Saturday, February 3, 2018

आज अटकेचा चौथा दिवस (४) ४ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांचा मेळ घाटातून चौथ्या दिवसाचा अटकेचा प्रवास संपला होता.....! स्वराज्याच्या छत्रपती यांना वाचविण्यासाठी धनगर तरुणांना वीर मरण आले होते...! आम्ही आहोत स्वराज्यातील “धनगर योद्धा” ....!



विषय असा आहे की, १ फेब्रुवारी १६८९ मध्ये संभाजीराजांना मुखर्बखान स्वराज्यात जेरबंध करण्यासाठी निघाला होता.....त्यांच्या बरोबर बाळाजी आवजी बल्लाळ यांचा मुलगा खंडोजी बल्लाळ होता.आता हा बाळाजी आवजी बल्लाळ कोण....? असा प्रशन तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला आठवण करून देतो की,छत्रपती शिवाजी महाराज यांना विषप्रयोग करून मारण्याचे जे षड्यंत्र बनविले होते त्या आणणोजी दत्तो याचा सहकारी होता.त्याला संभाजीराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारण्याची शिक्षा चार वर्ष सुनावणी घेऊन दिली होती.त्यामुळे याठिकाणी मी नमूद करतो की,संभाजीराजांची अडीच हजाराची अंगरक्षक सेना गायब करण्यात याचेही षड्यंत्र होते.संभाजीराजेना अटक झाली तेव्हा या खंडोजी बल्लाळ चे काय झाले....? देसाई वाड्यातील देसाईचे काय झाले....? मालोजी घोरपडे सरनोबत होते त्यामुळे त्यांची ५००० सेनेची मनसबदारी होती.त्यांना मुखर्बखान संभाजीराजांना जेरबंध करण्यासाठी अकलूज वरून निघाला असल्याची खबर मिळाली होती.त्यांनाच का खबर देण्यात आली ती खबर संभाजीराजांना का...? देण्यात आली नाही......आणि मालोजी घोरपडे यांना ५०० ची सेना का घेऊन यावे लागले.संताजी घोरपडे निसटून जाण्यास यशस्वी कसे झाले...नंतर ते सरसेनापती कसे झाले.आणि मुखर्बखान याने   संभाजीराजे यांना जेरबंद केले होते...तेव्हा स्वराज्याचे सरसेनापती कोण होते.....? धनगर समाज मेळ घाटातून चालेले होते त्यांना त्याठिकाणी या अडीच हजार सेनेची चाहूल सशयित वाटली तेव्हा त्यांनी नीट टेहाळणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हे तर संभाजी महाराज आहेत.तेव्हा त्या धनगर तरुणानी मागे पुढे न पहाता ते पाच पंचविस जन मुखर्बखान याच्या सेनेवर तुटून पडले.मात्र त्या सेने समोर जास्त काळ टिकू शकले नाही.स्वराज्याच्या छत्रपती यांना वाचविण्यासाठी त्यांना वीर मरण आले होते.

1 comment: