Thursday, February 1, 2018

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज १ फेब्रुवारी रोजी पहिला अटकेचा प्रवास सुरु झाला होता....! आपल्या पूर्वजांनी केला होता छत्रपती संभाजी महाराज यांचा विश्वासघात....म्हणून मी करतोय आपल्या पूर्वजांच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी आत्मक्लेश.....!आज ३२९ वर्षापूर्वी १ फेब्रुवारी १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथील खेळण्यावर होते...ते खेळण्यावरून खाली शृंगारपुरात आले होते.वैदिक धर्म पंडितांच्या पूर्वनियोजित कटकारस्थानुसार तेथे औरंगाजेबाचा सरदार मुखर्बखान संभाजीराजांना जेरबंद करण्यासाठी निघाला होता.संगमेश्वराच्या गणोजी शिर्के यांचा सरदार अर्जुना महार याला संपविल्याशिवाय छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करता येऊ शकत नव्हते याची माहिती मुखर्बखान याला वैदिक धर्म पंडितांकडून मिळाली होती.त्यामुळे त्याने पहिले गवताच्या पेंढ्यात अर्जुना महार याला जाळून मारले...गणोजी शिर्के यालाही अचानक झालेल्या हल्ल्यामुळे स्वत:च्या जीवाचे बलिदान द्यावे लागले.या हल्ल्याची खबर म्हालोजी घोरपडे यांना मिळाली असल्यामुळे ते संताजी घोरपडे याच्या सोबत पाचशे सैनिक घेऊन छत्रपती संभाजी महाराज यांना वाचवायला शृंगारपुरात आले होते.त्यांचे आणि मुखर्बखान यांचे तुंबळ युध्द झाले. त्यात ते धारातीर्थ पडले आणि तेथून संताजी घोरपडे निसटून जाण्यास यशस्वी झाला.मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचा खास सहकारी कविकलश जखमी झाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांना माघारी फिरावे लागले.त्यामुळे  मुखर्बखान यांने संधी मिळताच छत्रपती संभाजी महाराज यांना तात्काळ जेरबंद केले.ही घटना आज सायंकाळी घडली होती.
आता या घटनेतून उपस्थित झालेले प्रश्न -:
१ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी गुप्तहेर संघटना उभी केली होती ती संघटना कमकुवत
  करण्याच्या कटकारस्थानात कोण होते....?
२ छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचेसाठी अडीच हजाराच्या सेनेला
  अंगरक्षक म्हणून जी शपथ दिली होती ती सेना यावेळी कोठे होती......?
३ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जावई आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रामाणिक
  मेव्हणा गणोजी शिर्के याला विश्वासघातकी का म्हटले जाते.....?
४ छत्रपती संभाजी महाराज यांना माहीत होते की, मुखर्बखान याची अडीच हजाराची सेना
  स्वराज्यात आपले काहीच करू शकत नाही.कारण आपल्या स्वराज्यात प्रामाणिक मराठा
  सरदारांची कमी नाही हा त्यांचा विश्वास विश्वासघात ठरला काय...?

No comments:

Post a Comment