Friday, September 2, 2011

जिददीच्या जोरावर केला एमपीएससीचा गड सर

हंसराज पाटील जन्मत:च सेरेबल पाल्सी म्हणजे बहुविकलांगत्वाच्या आजाराने जखडलेला एक तरुण.. आजारामुळे त्याच्या शरीरातील नसा आखडून गेल्या. बोलताना जीभ आडखळत होती.आधाराशिवाय चालणे तर अशक्यच परंतु हंसराज डगमगला नाही. हंसराजच्या आई-वडीलांनी हैदराबाद येथील डॉ. बेडेकरांनी सुचविलेल्या ॲक्वाथेरेपीचे उपचार हंसराजवर सुरु केले. या थेरेपीचा एक भाग म्हणून पोहण्याचा सराव सुरु झाला. सुरुवातीला पाण्याला घाबरणा-या हसंराजने अल्पावधीतच फ्रिस्ट्रोक , बटरप्लाय , बॅकस्ट्रोक या पोहण्याच्या प्रकरांमध्ये कौशल्य प्राप्त केले. नाशिक जिल्हा नंतर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अपंगांच्या जलतरण स्पर्धेत हंसराजजने उल्लेखनीय यश मिळविले आहे. राज्य शासनाच्या एकलव्य पुरस्काराबरोबरच अनेक पुरस्कार हंसराजने मिळविले आहेत .

खेळात प्राविण्य मिळवत असताना शिक्षणातही प्राविण्य मिळवायचे हंसराजचे ध्येय होते. बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने कॉमर्समध्ये पूर्ण केले. पुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठातून कला शाखेची पदवी मिळविली नंतर राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचे त्याने ठरविले व तयारी सुरु केली.

जिदद आणि मेहनतीच्या जोरावर हसंराजने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परक्षेत यश मिळविले आहे. त्याची नायब तहसीलदार पदावर निवड झाली आहे. इथेच न थांबता केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उर्त्तीण होण्याचा व एम.बी..ए.करण्याचा त्याचा मानस आहे.

आपण अपंग आहोत याची सल मनात न बाळगता हंसराजने आपल्या जिददीच्या जोरावर आजावर केलेला जीवन प्रवास, दु:खात, कष्टात असणा-या लोकांसाठी प्ररेणादायी असाच आहे.
हंसराजच्या जिददीला सलाम …

  • देवेंद्र पाटील

  • No comments:

    Post a Comment