Tuesday, September 6, 2011

नवी पहाट

कांता राजेंद्र मेश्राम ही करुना स्वयं सहाय्य महिला बचत गटाची सदस्य होती. गटात येण्या अगोदर तिला भयंकर भीती वाटायची. बाहेर कुठेही जाण्याकरीता घाबरायची, कारण तिचे पतिचे पिलीया या आजाराने मृत्यु झाले होते. तिचे पति आय.टी.आय. आष्टीला शिक्षक होते. तिला दोन मुली व एक मुलगा आहे. तिचे पति असताना तिच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह सर्व काही व्यवस्थित होते. परंतु पतिचे निधन झाल्याने परिवाराची जबाबदारी कांतावर आली. तिचे सासरचे गांव पुलगांव आहे व तिच्या सासरची परिस्थिती फारच हलाकीची असल्यामुळे ती सासरी न जाता तिच्या आई वडीलाकडे येवून रहायचे ठरविले व मुलांना घेवून माहेरी राहू लागली.

कष्टकमाई करुन तिच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होती. आधी ती खुब कमी बोलायची. एक दिवस गावात माविमच्या सहयोगिनी आल्या त्यांनी बचत गटात सदस्य होण्याचे सांगितले व ती करुना स्वयं सहाय्य बचत गटाची सदस्य झाली.

आधीपासून थोडेफार शिवणकाम करता येत होते. गटात आल्यापासून व इतर सभासद महिला वेगवेगळे उद्योग करण्याकरीता गटातून कर्ज घेत होते. तिला पण वाटत होते की गटाकडून कर्ज घ्यावे व स्वत:ची शिलाई मशिन घ्यावी शिवणकाम करावे. त्यामुळे आपल्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित करता येईल. म्हणून मी गटाकडून कर्ज घेतले व शिलाई मशिन खरेदी केली व शिवणकाम करायला लागले. आधी शिवायला कपडे फार कमी यायचे. परंतू आता तिच्याकडे भरपूर काम येते. त्यामुळे मी माझ्या मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह व्यवस्थित करीत आहे. गटाकडून घेतलेल्या कर्जाची तिने परतफेड केली.

कांता जेव्हापासून बचत गटाची सदस्य झाली तेव्हापासून तिला बाहेरच्या गोष्टीची माहिती मिळू लागली. एवढेच नव्हेतर ती बचतगटाची कार्यकर्ती झाली. तिच्या विचारात बदल झाला. सर्व गोष्टीमुळे कारंजा तालुक्यातील लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष पदासाठी तिची निवड करण्यात आली. लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडीत आहे. अध्यक्ष झाल्यानंतर अकोला, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी अभ्यास दौ-याला गेली, मला वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर इतरही जिल्ह्याची माहिती झालेली आहे. आज मी घरची व बाहेरची जाबाबदारी पार पाडत आहे. तिची आशा वर्कर करीता निवड झाली. गावाचा विकास कसा करावा, या करीता सतत प्रयत्न करीत असते. आज माझ्यात बदल झालेला आहे. तो फक्त बचगटाचे सभासद झाल्यामुळे , याचे श्रेय माविमला देते. माविमने मला जे विविध प्रशिक्षण दिले त्यामुळे माझ्यात धाडसी वृत्ती निर्माण होऊन माझ्या जीवनात बदल घडून जीवनाचा विकास झाला आहे.

No comments:

Post a Comment