Wednesday, April 4, 2012

वाटचाल पर्यावरण समृध्दीकडे

वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगची समस्या, घटते पर्जन्यमान अशा संकटांमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. निसर्गाचा समतोल कायम रहावा व पर्यावरण संतुलित रहावे, त्यामुळे शासनाने २ वर्षापासुन सुरु केलेली पर्यावरण संतुलित समृध्द गाव योजना आता दुस-या टप्याकडे वाटचाल करीत असून या टप्यावर बुलढाणा जिल्हयातील १०३ ग्रामपंचायती या प्रथम वर्षाच्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहे.

पर्यावरण संतुलीत समृध्द गाव योजनेअंतर्गत समितीने तपासणी करुन गावाची निवड केली आहे. बुलढाणा जिल्हयात ११३ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव या अंतर्गत जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले होते त्यामधुन १०३ गावे अनुदानासाठी पात्र ठरली आहे. विशेष म्हणजे जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यातील सर्वाधिक गावे अनुदानासाठी पात्र ठरले असून या परिसरातील अभयारण्यामुळे ही योजना परिसरात ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे या गावाला ८ लाख रुपये, वडगाव गड या गावाला ५ लाख रुपये तर खेर्डा, निभोरा, सुलज, वडगाव पाटण, गाडेगाव बु, भेडवळ खु, महाखेड बु , पळशी वैद्य,झाडेगांव या गावांना प्रत्येकी ३ लाख रुपये तसेच मांडवा, पळसखेड, गाडेगाव खु, मडाखेड बु या गावांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अनुदान प्रस्तावित केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील १० गावे या योजनेसाठी पात्र ठरले असून सोनाळा या गावाला १० लाखाचे अनुदान प्रस्तावित केले आहे. तर संग्रामपूर ५ लाख, सगोडा , वरवट बकाल, एकलारा बानोदा प्रत्येकी ४ लाख तर परसोडा, उमरा, काकणवाडा बु, काकणवाडा खु, कोलद, उमरा उटाळी या गावांना प्रत्येकी ३ लाख अनुदान प्रस्तावित केले आहे.

वडजी, कौन्टी, पिंपरी धनगर व जयराम गड २ लाख मेहकर तालुक्यातील कल्याणा ३ लाख तर बदनापूर २ लाख, चिखली तालुक्यातील टाकरखेड मुसलमान ३ लाख, खोर ३ लाख, पांगरी, धामणगांव, म्हसला बु ४ लाख, हतेडी खु, मातला, पळसखेडभट, माळंवडी ३ लाख, दत्तपुर, सिंदखेड २ लाख, देऊगांवराजा तालुक्यातील मंडपगांव, दगडवाडी, उंबरखेड, गिरोली खु प्रत्येकी ३ लाख तर गोधणखेड तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी, भोसा ३ लाख तर हनवतखेड, वाघोरा, आंबेवाडी, भंडारी, हनवतखेड ( महा), नाईकनगर, सुलझगाव प्रत्येकी २ लाख व लोणार तालुक्यातील गुंधा, गायखेड गावासाठी ३ लाख व पहुर या गावासाठी दोन लाख रुपये अनुदान प्रस्तावित आहे.

No comments:

Post a Comment